Wednesday, 6 October 2010

गाता गाता ....





एक क्षण असा येतो,
भावनेला 'स्वरांचे' मूर्तरूप देऊन जातो !
स्वर आणि मन यांच्या वेलीवर
सुरेल स्वर सुमनांचा गुच्छ लगडतो!

तळ्यातील निळ्याशार पाण्यातून षड्ज ऐकू येतो,


प्रत्येक लाटेवरचा  प्रत्येक  स्वर
'स्वयंभू गांधाराची' आठवण करून देतो !

पाना-फुलातून खेळणारा हळुवार वारा

रागाची तरल 'सरगम' गात राहतो,
पाण्यावरून वाहणारा वारा
 जोरकस 'तान' घेऊ पाहतो !

चढता सूर, चढत जाणाऱ्या मैफिलीचाच हा भास
,
जणू निसर्गाची स्वरभाषा सांगणारा बंदीशरुपी  स्वरसाज  !!

  
Teja

5 comments: